गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील एपीएल वरील (शेतकऱ्यांना) श्रेणीतील शेतकरी एक वर्षापासून शासनाच्या विविध योजनांमधील अनुदानापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत कोणतेही अनुदान जमा झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
शासनाच्या पुरवठा विभागामार्फत एपीएल वरील ( शेतकऱ्यांना) योजनांचे आर्थिक अनुदान दिले जाते. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्याच्या आर्थिक संकटात हे अनुदान मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निधी वितरित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी साईनाथ पवार यांनी व्यक्त केले.
गंगापूर पुरवठा विभागातील नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता, अनुदान वितरण प्रक्रियेत राज्य सरकारकडून कारणांमुळे काही विलंब झाला आहे. निधी मंजुरीनंतर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
मागील एक वर्षापासून वर्षभरात हे अनुदान थकले असून अनेक गंगापूर तालुक्यातील व शहरांत शेतकऱ्यांनी याबाबत गंगापूर पुरवठा विभागात व जिल्हाधिकारी पुरवठा विभागामध्ये वारंवार पाठपुरावा केला, तरीही अद्याप निधी जमा झालेला नाही. राज्य शासन याकडे लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरवर्षी आम्हाला ठराविक रक्कम अनुदानाच्या स्वरूपात मिळते. पण यंदा एक वर्ष उलटलं तरी पैशांचा मागमूस नाही. बँकेत चौकशी केली तर खाते रिकामे आहे, असे अल्ताफ शेख या शेतकऱ्याने सांगितले.